शिक्षणाच्या साहाय्याने वंचित मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची दृष्टी असलेल्या श्री. बसवराज आणि सौ. गोदावरी द्याडे यांनी 1995 मध्ये निती निकेतन बहुउद्देशीय ट्रस्ट स्थापन केली.
आमचे संस्थापक श्री. बसवराज द्याडे हे गणित विषयात पदवीधर असून एक हायस्कूल शिक्षक आहेत. शिक्षणाप्रती समर्पित असलेल्या सौ. गोदावरी द्याडे सर्व पारंपारिक आव्हानांना सामोरे जात संस्था उभारणीस खंबीर पाठिंबा देत आल्या आहेत. सामाजिक सेवेसाठीची आपली अटळ वचनबद्धता कायम ठेवण्यासाठी वैयक्तित जीवनात या दाम्पत्याने अनेक कठोर निर्णय घेत संस्थेचे कार्य अविरत सुरु ठेवले आहे.
शिक्षणाद्वारे नैतिक मुल्य रुजवत अधिक चांगला समाज निर्माण करण्याचा विश्वास म्हणजे निती निकेतन! हा विश्वास सार्थ करत असताना बदलत्या काळासोबत समाजासमोर आलेल्या अनेक नवीन गरजा पूर्ण करण्यावर देखील संस्था लक्ष ठेवून आहे.
निती निकेतन बहुउद्देशीय संस्था ही नैतिक शिक्षणासाठी वचनबद्ध असून प्रत्येक मुलास त्याच्या सर्व क्षमता सिद्ध करण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. संस्थेच्या अविरत कार्यासाठी आदरणीय संस्थापक यांची दूरदृष्टी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. आजवरचे सकारात्मक परिणाम संस्थेचे काम चालू ठेवण्यासाठी बळकटी देत आहेत.
सध्या आम्ही तीन मुख्य कार्यक्रम चालवितो:
निती निकेतन बहुउद्देशीय ट्रस्टमध्ये, आम्ही नितीमूल्यांवर आधारित शिक्षण आणि प्रत्येक मुलाला त्याच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी या विश्वासाने प्रेरित आहोत. आमच्या संस्थापकांच्या दृष्टिकोनाने आणि समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याच्या आमच्या प्रयत्नांनी आम्हाला सतत प्रेरणा मिळत आहे.
1995 साली श्री. बसवराज द्याडे आणि सौ. गोदावरी द्याडे यांनी नैतिक शिक्षण आणि मूल्यांच्या आधाराने समाजातील वंचित मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी निती निकेतन बहुउद्देशीय ट्रस्टची स्थापना केली. गणित विषयात पदवी घेतलेले श्री. बसवराज द्याडे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. सौ. गोदावरी द्याडे यांचे औपचारिक शालेय शिक्षण फार नसले तरी शिक्षणाप्रती त्यांची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. संस्था स्थापनेनंतर ती चालविताना दोघांनी अथक मेहनत घेतली. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही, त्यांनी त्यांच्या पगाराचा मोठा हिस्सा गरीब मुलांचे शिक्षण व सामाजिक सेवेसाठी खर्च केला. स्वतः अडचणीत असतानाही इतरांना खंबीर आधार पुरवत श्री. बसवराज द्याडे आणि सौ. गोदावरी द्याडे हे इतरांसाठी आशेचा किरण ठरले.
इतक्या वर्षात निती निकेतनने एक छोटेखानी, तळागाळातील प्रयत्न ते एक प्रभावी संस्था म्हणून यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. सध्या निती निकेतन तीन महत्त्वपूर्ण कार्यक्रम चालविते: अनाथ मुलांसाठीचे मौली बालक आश्रम, मुलींसाठी मातोश्री रेवम्मा हे आधारगृह, आणि द क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भागिरथी बाल संगोपन योजना. हे सर्व कार्यक्रम वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करतात. निती निकेतन हे समाजातील वंचित मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री. बसवराज द्याडे आणि सौ. गोदावरी द्याडे यांच्या समर्पण, दृष्टी, कष्ट आणि त्यांची वचनबद्धता यातून साकारले एक स्वप्न आहे.
“ प्रत्येक वंचित मुलास नैतिक शिक्षण पुरवत त्यांच्या पूर्ण क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल असे जग तयार करत, त्याद्वारे सन्मान, समानता आणि सबलीकरण पुरस्कृत करणारा समाज निर्माण करणे.”
“वंचित मुलांना गुणवत्तापूर्ण, नैतिक शिक्षण आणि सर्वसामावेशी पाठिंबा पुरवत त्यांचे कल्याण आणि विकास सुनिश्चित करणे. प्रत्येक मुलास त्याच्या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी, त्याची स्वप्ने साध्य करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक योगदान देण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
करुणा : प्रत्येक मुलाच्या गरजा सहानुभूतीपूर्वक समजून घेत त्याला समर्पक असे काळजीपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.
सचोटी : आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आमच्या सर्व कामांमध्ये असलेली पारदर्शकता सुनिश्चित करते की आमचे सर्व प्रकल्पकार्य नैतिक नियमांचे पालन करते.
सशक्तीकरण : आम्ही मुलांना सशक्त बनविण्यावर विश्वास ठेवतो. मूलभूत शिक्षण मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देत स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व घडविण्यात मदत करते.
वचनबद्धता : मुलांना मूलभूत शिक्षण आणि पोषक वातावरण मिळवून देण्याच्या आमच्या कार्यप्रतीचे समर्पण आम्हाला सतत प्रयत्न करत राहण्यासाठी आणि नवनवीन सुधारणा आत्मसात करत प्रयत्नांना नवीन बळकटी देण्याचे काम करते.
सर्वसमावेशकता: आम्ही विविधता स्वीकारतो. कोणत्याही पार्श्वभूमीचा विचार न करता सर्व मुलांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधने आणि संधी मिळवून देण्यावर भर देतो.
सहकार्य : आम्ही भागीदारीला महत्त्व देतो. आम्ही टीमवर्क करत लोकसमुदाय, शासकीय-निमशासकीय संस्था यांच्या सोबतीने आमचे कार्य करत ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतो.
आदर : सर्व व्यक्तींचा सन्मान आणि त्यांचे मूलभूत हक्क यांचा आम्ही आदर करतो आणि
सर्वांना समान वागणूक देतो.
निती निकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे
माऊली बालक आश्रम (माऊली बालगृह),
वाडेबोल्हाई,
वाडेगाव रोड,
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे,
४१२२०७